Friday, November 12, 2010

एक मी तुझा खुळा ...खुळी माला हवीस तू ...

खुळाच मी खुळीच तू
खुळाच ये पुन्हा ऋतू I
खुळे गगन खुळी धरा
खुळी पुन्हा हवीस तू II 1 II

खुळेपणा सभोवती
खुळ्या खुणाच भेटती I
खुळेच तन खुळेच मन
खुळी पुन्हा हवीस तू II 2 II

खुळी खळी खुळे हसू
खुळे पुन्हा उदया दिसू I
खुळ्या मिठीत स्वर्ग तू
खुळी पुन्हा हवीस तू II 3 II

खुळ्या परी खुळेच खुळ
जुने तरी नवेच खुळ I
खुळ्यास खुळ लावण्या
खुळी पुन्हा हवीस तू II 3 II

खुळ्यास वाटता खुळे
खुळी फुले खुळ्या कळ्या I
खुळा वसंत सांगतो
खुळी पुन्हा हवीस तू II 4 II

.....माझी कविता ..मयुरेश साने

No comments:

Post a Comment