Friday, November 12, 2010

गाईले मी गीत कोठे ? वेदना गाऊन गेल्या

वेदनाही तुझ्या प्रमाणे
मागितल्या तेव्हाच फसवून गेल्या

टाळले मी लाख तेव्हा
नेमक्या भेटून गेल्या

हाय ती जाते अशी की
वेदना जवळून गेल्या

दुःख माझे हेच - मजला
वेदना वगळून गेल्या

याद ती आली अशी की
पापण्या स्पर्शुन गेल्या

गाईले मी गीत कोठे ?
वेदना गाऊन गेल्या

वाहवा ऐकून तुमच्या
मज वेदना सोडून गेल्या

अन सुखाच्या वादळातच
वेदना पेटून गेल्या

मी पाहिला जो आरसा तो
वेदना फोडून गेल्या

आसवे नाहीत उसनी
वेदना बरसून गेल्या

दुःख उल्हासात माझे
वेदना हसवून गेल्या

संजीवन वेदना ऊमलली
स्मृति पाकळ्या निर्माल्य झाल्या

माझी कविता मयुरेश साने दि.०९-अगस्त-२०१०

No comments:

Post a Comment