Friday, November 12, 2010

हवा हात हाती - उन्हें जाळलेला..........

तिने शब्द माझा - असा पाळलेला
जसा "कैदखाना" - गुन्हे पाळलेला

नको चांदणे - चन्द्र मी टाळलेला
हवा हात हाती - उन्हें जाळलेला

तिच्या मोगऱ्याला- असे गंध माझा
असा जीव माझा - तिने माळलेला

कितीदा ? तुला - मी "भजावे" "पुजावे"
विधाता तपालाच कंटाळलेला

तिची वाट वाटेतुनी रोज भेटे
तिच्या आठवांचा- सडा शिंपलेला

तिने कुंपणापास येउन जावे
म्हणोनी माला "मी" - तिथे टांगलेला

तिच्या सावलीचा - मला स्पर्श व्हावा
उन्हाचा प्रवासी - इथे थांबलेला

माझी कविता.. मयुरेश साने..दि ०२-अक्टूबर-10

No comments:

Post a Comment