जन्म गेला फाटके शिवण्यात आणी
ही तरीही उसवलेली जिंदगाणी
हुंदक्याना वाहिले आयुष्य जेव्हा
थांबले तेव्हा कुठे डोळ्यात पाणी
वाटते पुन्न्हा पुन्हा व्हावे अडाणी
आठवण आहे तुझी इतकी शहाणी
अडगळीचा कोपरा असलो तरीही
एकदा हटकून तू करते पहाणी
भर उन्हातच सावलीची भेट घेऊ
आयती थंडी किती कंटाळवाणी
पाहिजे आहे मला तू अन् तुला मी
सप्तजन्माला पुरेशी ही कहाणी
मयुरेश साने
ही तरीही उसवलेली जिंदगाणी
हुंदक्याना वाहिले आयुष्य जेव्हा
थांबले तेव्हा कुठे डोळ्यात पाणी
वाटते पुन्न्हा पुन्हा व्हावे अडाणी
आठवण आहे तुझी इतकी शहाणी
अडगळीचा कोपरा असलो तरीही
एकदा हटकून तू करते पहाणी
भर उन्हातच सावलीची भेट घेऊ
आयती थंडी किती कंटाळवाणी
पाहिजे आहे मला तू अन् तुला मी
सप्तजन्माला पुरेशी ही कहाणी
मयुरेश साने