Thursday, November 25, 2010

तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?...

पसारे तुझे आवरावे कशाला ?
स्वत:ला असे सावरावे कशाला ?

झोकून देतो मझ्यातला मी
तुझ्यातच असे सापडावे कशाला ?

जरा सांज होता तुझी याद येते
पारव्याने असे गीत गावे कशाला ?

तुझा स्पर्श व्हावा विसावा सुखाचा
तुझ्यातून मी वावरावे कशाला ?

तुझ्या आठवांनी बिलगता कुशीला
दीपकाने असे मंद व्हावे कशाला ?

जरा कान देण्या कळी फूल होते
भ्रमर गीत ऐकून बावरावे कशाला ?

जीव उरला कुठे ? लावण्याला पणाला
तरीही तिने मुस्कुरावे कशाला ?

मयुरेश साने..दि..२४-नोव्हेंबर-१०

फक्त दे तू हात या हातात माझ्या...

फक्त दे तू हात या हातात माझ्या
बघ कशा संवेदना गातात माझ्या

मी फुलांचे ताटवे फुलवून गेलो
मोगर्‍याचा गंध मुक्कामात माझ्या

भक्तिने नेवैद्य मी अर्पुन आलो
जेवतो माझा "विठू" ताटात माझ्या

काय तू रमते अशी भासात मझ्या
ठेव थोडा श्वास तू श्वासात माझ्या

कुंकवाचा साज भाळी रेखुदे ना
रंगुदे सौभग्य ते रंगात माझ्या

मी हिशेबी राहिलो नाही तरीही
बेरजा - वजाबाक्या ठरतात माझ्या

मयुरेश साने....दि...२३-नोव्हेंबर-१०

Friday, November 12, 2010

मैत्री जन्माची पुण्याई......

"मैत्र" जिवाचे माउली गाते
हिरवे नाते मनामनाचे
अवखळ खळखळ
निर्झर निर्मळ
जसा झरा वाही
मैत्री जन्माची पुण्याई......

"मित्र" म्हणता -"मी"- पण गळते
हृदयी चे - "ते"- हृदयी कळते
कळकळ तळमळ
आर्जव आग्रह
मित्र सर्व काही
मैत्री जन्माची पुण्याई......

मैत्री नाते निळ्या नभाचे
श्याम सख्याची मुरली गाते
घननिळ मधुशीळ
अवघे गोकुळ
कृष्ण सुदामा ही
मैत्री जन्माची पुण्याई......


"नाते" - ना- ते रक्त मागते
"मित्रांगणी" या
जीवन फूलते
मैत्रीचा हा गुलाल उधळत
दिशा - दिशा गाई
मैत्री जन्माची पुण्याई......

माझी कविता ... मयुरेश साने...दि २२ -सितम्बर-10

मरतो रोज तरीही , मरणे कसे सरेना ?

जिंकुन डाव सारा,हे हारणे टेळेना
फसवून रात्र गेली , तरी स्वप्न मावळेना

चांदण भूल म्हणती ,पोर्णिमेस कोणी
माला तरी चंद्राचे डाग पाहवेना

फुलशील कधी केव्हा तू ? कळीला नका विचारू
मज कोमेजल्या फुलाचे , दुःख सोसवेना

का हासशी जगाला ? शहाणे कुणी न येथे
आरशात तू तुला ,पाहून ही कळेना ?

निद्रेस ही कळेना ,निद्रा फितूर झाली
मृत्युस जीवनाच्या , करते पुन्हा हवाली
मरतो रोज तरीही , मरणे कसे सरेना ?

माझी कविता ....मयुरेश साने.. दि ०५-जून-१०

आसवे तो हुंदका टाळुन गेली...

आसवे तो हुंदका टाळुन गेली
पापणीला सारखी जाळुन गेली

जागली जी रात्र माझ्या लोचनी ती
फसवीण्याचा वायदा पाळुन गेली

मी जरा केला उभा माणूस मनीचा
"जात" आली आडवी चाळुन गेली

स्वप्न माझे कागदी हळुवार इतके
कातरिची धार ओशाळुन गेली

फासले असेल ही काळे - त्या माणसांनी
"ती" तरी कधी- हा चेहरा कुरवाळुन गेली ?

रंगला तो सावळा भजनात ऐसा
मृदुंगाला थाप गोंजारून गेली

उपोषणाने ही जीव जात नाही
सिध्धिच तपला कंटाळुन गेली

तो गुन्हा होता जरासा लाघवी
"चूक" ती...... पुन्हा वावरून गेली

आठवांचा मोगरा आता कुशीला
जिंदगानी अशी गंधाळुन गेली

टाळलेस माझे गीत तरीही
ओळ ओठांवरी रेंगाळुन गेली

का दाविले दुःख मयुरेश तू
सावलीही उन्हें माळुन गेली
माझी कविता ... मयुरेश साने.. दि. १२-सितम्बर-१०

तुझ्याच हाती - हात राहील.....

जे "सुरात "नाही- तेच "उरात" राहील
बेसुर्‍या ओळीच- ती -गात राहील

जे "टाळायचे "-तेच- "कानभर "होईल
जे सांगायचे -तेच- आत राहील

जे "तेवायचे" तेच "वि़झुन" जाईल
केवीलवाणी -एक- वात राहील

तू गेल्यावर ध्यास कशाचा ?
श्वासही उगाच येत -जात राहील

जगेन आता -रोज असा की
पुढ्यात जगाच्या " कात" राहील

"मी " हाता बाहेर- गेलो तरीही
तुझ्याच हाती - हात राहील

मयुरेश साने..दि १०-ऑक्टोबर-१०

चेहरा दे कोणताही -बाटतो का आरसा ?

सोवळ्याचा सोस - पाळा पुर्वजांचा वारसा
चेहरा दे कोणताही -बाटतो का आरसा ?



मी भला माणूस होतो - राहिलो निस्संग मी
पत्थराच्या पास कोणी - ठेवतो का आरसा ?


हासती माझ्यावरी - ते - बोलती "वेडा" मला
हासणार्‍या सांग रे ! - "तू " टाळतो का ? आरसा !


गोठलेल्या आसवांनी - गाडल्या मी "त्या" स्म्रुती
कोण दाटे लोचनी ते दावतो का ? आरसा !


लाख जोंबाळा असत्ये या जगाला जिंकण्या
जे खरे ते दाविल्याविण राहतो का आरसा ?

मयुरेश साने..दि.२९-ऑक्टोबर-२०१०.

मौत ही तरी पुन्हा पाळण्यात गेली.....

जिंदगी जरी पुन्हा टाळण्यात गेली
मौत ही तरी पुन्हा पाळण्यात गेली

शेवटी निर्माल्य बनुनी वाहलो तरीही
रात्र "तिची" स्वप्न फुले माळण्यात गेली

हक्क अश्रुचा पुन्हा अदा करुनही
मौज अश्रुची तरीही वाळण्यात गेली

प्रश्न मी विचारता - गीत तू दिले मला
त्या मधली "तीच" ओळ गाळण्यात गेली

खाक मी अता मला - हाका कशास मारीसी
निवडुन घे राख आता जाळण्यात गेली

तीच "तू" -नी -तोच "मी" ही - दोन असून एकटे
हि उभी हयात " तू "धुंडाळण्यात गेली

मयुरेश साने...दि.२३-ऑक्टोबर-१०

चुंबिण्या येऊ नको तू............

संपलेला ध्यास आता
दोन उरले श्वास आता

मोडुनी त्रिज्या सुखाच्या
विश्व केले व्यास आता

स्वप्न ती देऊन गेली
सत्य भासे भास आता

जिंकुनी पैजा विजांच्या
सोसुदे मधुमास आता

ओंजळी अश्रु तुझा "ही "
फक्त उरली प्यास आता

चुंबिण्या येऊ नको तू
डंख मुरले आत आता

घेउनी संन्यास जावे
हा खरा हव्यास आता

मयुरेश साने..दि.२५-ऑक्टोबर-२०१०

की ? कागदाशी खेळणारा टाक आहे ?..

ज्योतिने काळोख केला ख़ाक आहे?
की उजेडाला दिव्याचा धाक आहे ?

कंदिलाला काजळीचा शाप येथे
हो ! तसे चारित्र्य माझे पाक आहे !

"वासना"! व्हावी फुलांचा "गंध" येथे ?
"नाक" नाही - तो मनाचा "बाक" आहे !

राख ही खोटी कपाळी लाउनी ! का?
"स्वार्थ" होळी पेटु दे ! ही भाक आहे ?

मी कुठे मुद्दाम हा मुक्काम केला?
मोडले माझे सुखाचे चाक आहे

काळजाशी मांडल्या संवेदना ! की ?
कागदाशी खेळणारा टाक आहे ?

मयुरेश साने ...दि..२२ ओक्ट-10

झाला लिलाव माझ्या नाजूक भावनांचा....

झाला लिलाव माझ्या नाजूक भावनांचा
आता रतीब आहे साजूक सांत्वनांचा

नर्कात पूज्य होतो - देतो बळी स्वताला
गर्भात गूढ़ होता प्रश्नार्थ वामनाचा

निर्घ्रूण वास्तवाचे अंगार साहताना
आभास रोज होता स्वप्नात चांदण्यांचा

आता वठून मी ही निष्पर्ण झाड झालो
बागा रुसून गेल्या तो हार कुंपणांचा

लावा खुशाल बोली " खोलीतल्या "सुखाची
दारातल्या व्यथेचा "दया" साज तोरणांचा

मयुरेश साने ....दि २० ओक्ट 10

अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.....

मला कशास भेटती ? तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा
तुझ्या परीच वागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.....

पुसू कश्या तुझ्या स्मृती ? स्मरू तरी किती पुन्हा?
मला पुसून टाकती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

जरी तुझ्या सवेच मी ! तुझ्याच आसपास मी
उगाच वाट पाहती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......

अजून चंद्र चांदण्या ! तुला मलाच शोधती
बनून स्वप्न जागती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा

जुना रदीफ़ काफिया ! मुशायरा नवा पुन्हा
तशा नवीन भेटती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा.......

जिवंत मी ! असा कसा? मरून संपलो तरी ?
अजून श्वास पाळती ! तुझ्या खुणा पुन्हा पुन्हा........

मयुरेश साने ........दि..१६-ओक्ट-10

स्पर्शात वेदनेचा अंगार साहिला मी.............

डोळ्यातुनी व्यथेचा हुंकार वाहिला मी
स्पर्शात वेदनेचा अंगार साहिला मी

ओल्या सुरात माझ्या ठेऊन गीत वेडे
कंठात जीव घेणा गंधार गाईला मी

व्याकूळ कोण येथे त्यांना कसे कळावे ?
चोचीत चातकाच्या मल्हार पाहिला मी

देतील ते उद्याला आश्वासने उद्याची
अत्ताच रोख त्यांचा सत्कार पाहिला मी

घायाळ मी जराही प्रेमात होत नाही
तो वार ही जरासा अल्वार साहिला मी

मयुरेश साने...दि १४-अक्टूबर-10

का अश्रुस येत आहे ,रंग लाल आता ?

चाहुल एक वेडी, छळते उगाच आता
का कोकीळेस सुचला, मारवाच आता ?

ह्रुदयात फुल रुतते पायात रुते काटा
झाला कसा दोघांचा स्वभाव एक आता ?

जुळले तुझे नि माझे , तरी माझे तुझे जमेना
का अश्रुस येत आहे ,रंग लाल आता ?

सरले तुझे नि माझे नाते युगायुगांचे
का पापणीस जाळी ,अश्रु उगाच आता ?

माझी कविता ....मयुरेश साने.. दि ०५-जून-१०

मन झाले ओले चिम्ब.......

मन झाले ओले चिम्ब, तुझ्या आठवांचा गंध I
दाही दिशा माझ्या हाका , तुझे आकाश अथांग II

बेधुंद तू लाट ,माझ्या आयुष्याची पहाट I
मी किनारा कोरडा , तू प्राजक्ताचा सडा II

मी तहान तहान , तू ओले चिम्ब रान I
मी चातकाची चोच , तू निरभ्र आकाश II

मी आता काट्यात, तू फूलता फुलात I
सांभाळ माझी फुले , जी फुलली निरंतर अश्रु धारांत II

माझी कविता ...मयुरेश साने...१७-जून-१०

अश्रु पिउन माझे ...मी जगलो इथे .........

माला जाळून त्यांची , बेगडी आसवे गेली
आसवात मी ज्यांच्या, ते डोळे गेले कुठे ?

का खोटी आश्वासने दिली तू
मी तुला "ये"... असे म्हटले खरे कुठे?

माला जाळून , भोगती दिव्य रोषणाई
तेवलो तूफानातही तरी, लावती ते ,पर्यायी दिवे इथे

न मागुनही त्यांची , फक्त आश्वासने आली
आयुष्यभर वाहिली मी.. ज्यांची हमाली इथे

तुझा दगा अद्याप दगाबाजातला नाही
सजा ती गोड़ स्वच्छंदी.. अजुन मी ऊपभोगली कुठे ?

तहान मृगजळालाही फसवण्याची लागली सदा
नजरेचे मृगजळ तिच्या, अश्रु पिउन माझे ...मी जगलो इथे

माझी कविता.... मयुरेश साने.... दी १८-जुलाई-10

एक मी तुझा खुळा ...खुळी माला हवीस तू ...

खुळाच मी खुळीच तू
खुळाच ये पुन्हा ऋतू I
खुळे गगन खुळी धरा
खुळी पुन्हा हवीस तू II 1 II

खुळेपणा सभोवती
खुळ्या खुणाच भेटती I
खुळेच तन खुळेच मन
खुळी पुन्हा हवीस तू II 2 II

खुळी खळी खुळे हसू
खुळे पुन्हा उदया दिसू I
खुळ्या मिठीत स्वर्ग तू
खुळी पुन्हा हवीस तू II 3 II

खुळ्या परी खुळेच खुळ
जुने तरी नवेच खुळ I
खुळ्यास खुळ लावण्या
खुळी पुन्हा हवीस तू II 3 II

खुळ्यास वाटता खुळे
खुळी फुले खुळ्या कळ्या I
खुळा वसंत सांगतो
खुळी पुन्हा हवीस तू II 4 II

.....माझी कविता ..मयुरेश साने

माझे असे स्वतःशी- नाते अभंग आहे !

माझे न कोणी मजला - माझाच संग आहे
माझे असे स्वतःशी- नाते अभंग आहे !

आक्रोश थांबवा रे - टाहो नकाच फोडू
कोणत्या काळजाचा ठोका जिवंत आहे ?

समजावुनी स्वतः ला - आता एकंदरिने
मज हे ही पसंत आहे - मज ते ही पसंत आहे

हासू कसा जगाला ? - शहाणे कोण येथे ?
आरशात मीच मजला - कोठे पसंत आहे ?

त्यांना कसे कळावे ? - का ? "गाडले " पुरावे
मजला लुबाडणारा - लोकात "संत" आहे !

काटे असून येथे - अजुन फुल फूलते
जो तो म्हणे आताशा - चळला वसंत आहे !

का ? मारून मी स्वतः ला - जगलो असा कळेना !
अंता पर्यंत आता - दिगंत खंत आहे !

माझी कविता ... मयुरेश साने..दि २७-अगस्त-10

गाईला कुणी तो दोहा ...माझे दुःख पांगळे झाले...

असुनही मी शहाणा....माझे वेडे ठरणे झाले
त्यांनी मागितल्या संधीचे... नेहमीच सोने झाले

पाहूनही मी त्यांना... त्यांची झालो नाही काठी
त्यांना सारे दिसते .....ते ठरवून आंधळे झाले

वर्गणी दक्षिणा सारे ....आर्जवी पुकारे झाले
त्यांचा गल्ला भरला ....माझे खीसे रिकामे झाले

गाईला कुणी तो दोहा ...माझे दुःख पांगळे झाले
कडवे दुःखच आता ...गाण्यातील कडवे झाले

कुसुम गंध माझा मी ...सांगा कधी लपविला होता?
खुडून त्यांनी मजला ...हे पुन्हा कुस्करणे झाले

मी सर्वांचा होतो माझे... कुणी न कधीही झाले
रियाज दांडगा होता ... त्यांचे गळे काढणे झाले

मी कधीही ऋतू प्रमाणे... अमक्याच वेळी न आलो
वसंत हवा कशाला?... माझे ग्रिष्मात बहरणे झाले

अंतर्ल्या भेटी गाठी ... अंतर बहाणे झाले
मी स्वभाव अश्रुचा झालो...अश्रुस वाहणे झाले

मी कैसा आस्तीक होतो ... अनादी अनंताचा
पावला न कधीही त्याला...मखरात बसवणे झाले

नावडत्या प्रश्नाचे जरी ...दिनरात ऊखाणे झाले
फीकीर कुणाची मयुरेश ... तुझे दुःख दीवाणे झाले

.....माझी कविता ..मयुरेश साने.. २४-August-10

"I LOVE YOU"

I म्हणजे मी आणि You म्हणजे तू
"I LOVE YOU"
माझा न मी ... तुझी न तू
"I LOVE YOU"
तुझ्यात मी - अन माझ्यात तू
"I LOVE YOU"
वातित मी - अन ज्योतित तू
"I LOVE YOU"
नशेत मी - अन शराब तू
"I LOVE YOU"
आधार मी - अन आश्रय तू
"I LOVE YOU"
श्वासात मी - अन ध्यासात तू
"I LOVE YOU"
सायास मी - विनासायास तू
"I LOVE YOU"
आरशात मी - प्रतिबिम्बात तू
"I LOVE YOU"
कवडश्यात मी - कड्या-कुलुपात तू
"I LOVE YOU"
प्रवास मी ... पायवाट तू
"I LOVE YOU"
अश्रूत मी --- त्याच्या मिठीत तू
त्रासात मी---- अन त्रासात तू
"I Love You"
"I Love You" "I Love You"
"I Love You"

माझी कविता... मयुरेश साने.. दि १०-सितम्बर-10

या जगाला "मी" कुठे ठाऊक आहे ?.............

बासरीला फूंकरीची भूक आहे
सावळ्याच्या अंतरी ती मूक आहे

चातकाच्या लोचनी पाऊस दाटे
सोबतीला कोकिळेची कूक आहे

सोनियाचा देव गाभारा रिकामा
पायरीशी थांबला भावूक आहे

आज "ने -त्यान्नो" जराशी चाड ठेवा
लेखणीच्या आतही बंदूक आहे

रोषणाईची दिवाळी खूप झाली
वीज ही या अंबरी अंधूक आहे

दाद गाण्याला मिळाली - ना इथे ही
ती निराळी "मैफलीची" चूक आहे

वेदनेला मोकळे केले तरीही
काळजाला काळजीची हूक आहे

लाख गोंजारा जगाच्या " मी " पणाला
या जगाला "मी" कुठे ठाऊक आहे ?

माझी कविता... मयुरेश साने...दि २५-सितम्बर-10

हवा हात हाती - उन्हें जाळलेला..........

तिने शब्द माझा - असा पाळलेला
जसा "कैदखाना" - गुन्हे पाळलेला

नको चांदणे - चन्द्र मी टाळलेला
हवा हात हाती - उन्हें जाळलेला

तिच्या मोगऱ्याला- असे गंध माझा
असा जीव माझा - तिने माळलेला

कितीदा ? तुला - मी "भजावे" "पुजावे"
विधाता तपालाच कंटाळलेला

तिची वाट वाटेतुनी रोज भेटे
तिच्या आठवांचा- सडा शिंपलेला

तिने कुंपणापास येउन जावे
म्हणोनी माला "मी" - तिथे टांगलेला

तिच्या सावलीचा - मला स्पर्श व्हावा
उन्हाचा प्रवासी - इथे थांबलेला

माझी कविता.. मयुरेश साने..दि ०२-अक्टूबर-10

अंत्य संस्कारास सजणे - हा खरा सत्कार आता..........


पश्चिमा होऊन ढळणे - राहिले भाग्यात आता
काजवा होऊन उड़णे - हा खरा सत्कार आता


काळजाच्या आत कुढणे - राहिले भाग्यात आता
कंदिलाची वात बनणे - हा खरा सत्कार आता


जातिने माणूस दळणे- राहिले भाग्यात आता
अंत्य संस्कारास सजणे - हा खरा सत्कार आता


बेगडी हास्यास भुलणे- राहिले भाग्यात आता
आसवांच्या आत बुड़णे- हा खरा सत्कार आता


आज नेत्यांचे बरळणे- राहिले भाग्यात आता
कुंपणाने शेत चरणे - हा खरा सत्कार आता


मयुरेश साने.. दि ०३-अक्टूबर 10

प्रश्ण तुझा - पेच मला

"माणुस" की "जात" मला ?
प्रश्ण तुझा - पेच मला

अंत नसे - पार नसे
साद तुझी - खेच मला

धाव तुझी - धाप मला
चाल तुझी - ठेच मला

ओठ तुझे -गोड किती
सांग मुक्यानेच मला

मी जपला - शेरसडा
वाच मला - वेच मला

घाव तुझे - लाख जरी
सौख्य असे- तेच मला

..मयुरेश साने ... दि..०३-अक्टूबर-10

प्रश्ण तुझा - पेच मला

"माणुस" की "जात" मला ?
प्रश्ण तुझा - पेच मला

अंत नसे - पार नसे
साद तुझी - खेच मला

धाव तुझी - धाप मला
चाल तुझी - ठेच मला

ओठ तुझे -गोड किती
सांग मुक्यानेच मला

मी जपला - शेरसडा
वाच मला - वेच मला

घाव तुझे - लाख जरी
सौख्य असे- तेच मला

..मयुरेश साने ... दि..०३-अक्टूबर-10

ते सिंह गर्जनेला कोल्हे कुई म्हणाले......

त्यांच्याच सांगण्याने सत्कार रोज झाले
ते सिंह गर्जनेला कोल्हे कुई म्हणाले

कोमेजला कसा रे ! प्राजक्त अंगणाचा
ते कागदी फुलाला - "जाई - जुई" म्हणाले

मी सांधले इथे ते - "नाते"- असे रफूचे
ते टोचले मला "मी" - "छद्मी सुई" - म्हणाले

सोयी नुसार त्यांनी - केले -"हिमा"- प्रमाणे
ते सोय पाहुनी - "मी"- आहे रुई म्हणाले

त्यांची जमीन आहे - मिंधी - मुजोर सत्ता
जे तारतील त्यांना -त्यांना - भुई म्हणाले

मयुरेश साने...दि ०४-ओक्ट-10

पुन्हा "जन्म" घेण्या जुगारी निघाला....

सुऱ्याने कधी ना इथे वार केला
सुरा मैफलीचा जिव्हारी निघाला

भला पाहिला आज गोपाळकाला
कसा "कंस" तो ही "मुरारी" निघाला

किती "न्याय" देण्या झटे न्याय दाता !
गुन्हे शोधण्याला फरारी निघाला

दुखी मी - कशाने ? कळावे कुणाला !
तिचा हुंदका व्यवहारी निघाला

तुझा हात खांद्यावरी आज माझ्या
नको वाटणारी शिसारी निघाला

फकीरीत आले समाधान हाती
अमीरीत "जो" "तो" भिकारी निघाला

पुन्हा ठेच पायी सुशोभीत झाली
तिचा उंबराही करारी निघाला

डसावे कुणीही भिनावे कुणीही
इथे गारुड़ीही विषारी निघाला

इथे घात होतो कुठेही कसाही
इथे "माणसा" तू शिकारी निघाला

करोनी घराची सदा बंद दारे
"विवेकी" निघाला - "विचारी" निघाला

फिरोनी पुन्हा त्याच त्या लाख "योनी"
पुन्हा "जन्म" घेण्या जुगारी निघाला

मयुरेश साने..दि ३०-सप्टेम्बर -१०

का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?....

वाहून काल गेला राहून साचलेला
मूळ ओळ सुधीर सरांची ...मी प्रयत्न करतोय...


वाहून काल गेला राहून साचलेला
का शब्द मी निघालो खोडून वाचलेला?

वारुळ हे जगाचे - नाते जपा विषारी
का डंख हा मिळाला आतून डाचलेला

काळोख ही विजेचा अंगार होत आहे
अंधार ही विजांनी पोळून टाकलेला

सारे तुला दिले मी माझी न राहिली तू
तो चोरटा निघाला माझाच वाटलेला

गाणे कसे म्हणू ती आता कुठे दिसेना
प्रत्येक हुन्दक्याला हा कंठ दाटलेला

यात्रेत त्या फुलांच्या "गंधाळल्या" दिशा का ?
कोमेजल्या फुलाने संदेश धाडलेला

मी हासतो सुखाने दुःखात नांदतो मी
तो चेहरा सुखाचा मी रोज फाडलेला

मयुरेश साने ....दि ०९ ओक्ट-10

शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई...

फोडून बांध मनीचा - झालो जसा प्रवाही !
अश्रु बनुन गेला - मग शब्द अर्थवाही

तोडून तसबीरिला - ती एकसंध राही
ऐना कसा कळेना - जपतो तिला मला ही

मागुन ही सुखाला - आले न हाती काही
दुःख हेंच मजला - देते अजून ग्वाही

सांगुन ही कुणाला - कळले न गुज मनीचे
कुसुमास कागदी त्या - कुठला सुवास येई?

कळवून ही तुला - मी कळलो कधीच नाही
तोच उम्बरा अन - तीच ठेच पाई

छापून ही स्वतः ला - मी ऊमट्लोच नाही
शब्द मागती ते - लिहिण्या अजून शाई

जाळुन ही मला - मी उरलो दिशांत दही
वारा धुरास माझ्या - चघळुन रोज पाही

टाळुन ही मला तू - मी टळलोच नाही
जरी चन्द्र मी आता - मी सूर्य उद्याचा ही

माझी कविता ...मयुरेश साने...दि १६-औग-10

नवा दे घाव वेदनांना...........

नवा दे घाव वेदनांना...........
किनारे लोटुनी सारे
प्रावाही शांत वाहताना

किती गर्दी तुझी आहे?
इथे एकांत असताना

मुका होईन मी जेव्हा
तुझ्या दे त्रास ओठांना

चुका मोजू नको माझ्या
सजा दे खास ओठांना

किती ओशाळले सारे
पुरावे न्याय होताना

तुझा आभास वावरवा
अशी दे स्मृति आठवांना

शब्द माझे मागती ती
तुझी दे चाल गीतान्ना

चन्द्र तू चांदणे मी
लाजवू या चांदण्याना

झोप माझी वाट पाही
अशी दे जाग स्वप्नांना

जाणीवा गोठल्या माझ्या
नवा दे घाव वेदनांना

माझी कविता ..मयुरेश साने..24-July-10

"हे" ही छळुन गेले -मज- "ते" ही छळुन गेले ......

 हे" ही छळुन गेले -मज- "ते" ही छळुन गेले...
काटे सदा फुलाला का?- ते कळुन गेले
बागेतल्या फुलांचे - कावे कळुन गेले

कामें जरा न होती - आश्वासने कशाला?
नेण्यास आज -"नेते"- आम्हा कळुन गेले

"नाही" म्हणावयाला येथे कुणी - न आले !
"होकार" ही "नकारा" हाती चळुन गेले

मी कंदमूळ झालो आता कशा?- कळेना
ते नागपंचमी ला मजला तळुन गेले

नावे तरी कितीदा घ्यावी पुन्हा पुन्हा ती
"हे" ही छळुन गेले -मज- "ते" ही छळुन गेले

किती आर्जवे पुकारे सुख लाभ व्हावयाला!
दुःख अश्रु बनुनी - आले - पळुन गेले

त्यानी कयास केला-"वाती" मळुन गेले
मी साहिल्या "व्यथान्नी"- दिवे जळुन गेले

तिने दिल्या "स्मृतींचा"- तो मोगरा उशीला
ते चांदणे कुशीला -थोड़े- वळुन गेले

अर्थ हरवलेली ती अक्षरे मिळाली
जाते आठवांचे मजला दळुन गेले

माझी कविता मयुरेश साने ..दि १८-Sept-10

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा
असून ही तुझा मी ....आहे अभाव माझा

दुःख्खास ही कधीची... आमंत्रणेच माझी
येता सुखास आहे...."घूम-जाव" माझा

मुखवटेच जरी का....ती माणसे तरीही
हा ऊम्बराही माझा....तो ऊम्बराही माझा

अब्रूस लक्तरांच्या टांगून वेशीला
किती अब्रुदार आहे !..सारा समाज माझा

हासून सुकविले मी.. अश्रु तसेच गाली
पापण्याच झाल्या ...ओला रूमाल माझा

तू उत्तरे दिली ती ...आता तुलाच छळती
उशिरा तुला समजला...कातील सवाल माझा

माझी कविता ...मयुरेश साने..दि १९-अगस्त-१०

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा

अश्रूस फ़क्त कळला....ओला स्वभाव माझा
असून ही तुझा मी ....आहे अभाव माझा

दुःख्खास ही कधीची... आमंत्रणेच माझी
येता सुखास आहे...."घूम-जाव" माझा

मुखवटेच जरी का....ती माणसे तरीही
हा ऊम्बराही माझा....तो ऊम्बराही माझा

अब्रूस लक्तरांच्या टांगून वेशीला
किती अब्रुदार आहे !..सारा समाज माझा

हासून सुकविले मी.. अश्रु तसेच गाली
पापण्याच झाल्या ...ओला रूमाल माझा

तू उत्तरे दिली ती ...आता तुलाच छळती
उशिरा तुला समजला...कातील सवाल माझा

माझी कविता ...मयुरेश साने..दि १९-अगस्त-१०

आरशातुनी सदैव - हद्दपार मी ............

ठेवले तुला जपून - लोचनात मी
आरशातुनी सदैव - हद्दपार मी


घेतसे जरी रडून आत - आत मी
आसवातुनी तुझा झालो - रुमाल मी


डाव ते पुन्हा नवीन - मागतोच मी
हारण्या पुन्हा तुला झालो - जुगार मी


वाटते जरी तुला अबोल - फार मी
कोणतेही गीत छेड़ व्याकुळ - सतार मी


वचने ती गोड तरी -जाणतोच मी
का राहिलो ? अखेर फ़क्त -वाटचाल मी


दुःख्खासवे अताशा केला - करार मी
येताच सूख नेमका होतो - फरार मी


तू तिथे त्याच्या कुशीत -आसवात मी
बरसतो आता मजेत - संथधार मी

माझी कविता ...मयुरेश साने...दि १५-अगस्त-10

गाईले मी गीत कोठे ? वेदना गाऊन गेल्या

वेदनाही तुझ्या प्रमाणे
मागितल्या तेव्हाच फसवून गेल्या

टाळले मी लाख तेव्हा
नेमक्या भेटून गेल्या

हाय ती जाते अशी की
वेदना जवळून गेल्या

दुःख माझे हेच - मजला
वेदना वगळून गेल्या

याद ती आली अशी की
पापण्या स्पर्शुन गेल्या

गाईले मी गीत कोठे ?
वेदना गाऊन गेल्या

वाहवा ऐकून तुमच्या
मज वेदना सोडून गेल्या

अन सुखाच्या वादळातच
वेदना पेटून गेल्या

मी पाहिला जो आरसा तो
वेदना फोडून गेल्या

आसवे नाहीत उसनी
वेदना बरसून गेल्या

दुःख उल्हासात माझे
वेदना हसवून गेल्या

संजीवन वेदना ऊमलली
स्मृति पाकळ्या निर्माल्य झाल्या

माझी कविता मयुरेश साने दि.०९-अगस्त-२०१०

ओठात माझीया मी गातो तुझेच गाणे

ओठात माझीया मी गातो तुझेच गाणे
ओठास ओठ दे तू गाइन मी मुक्याने

प्रिती तुझी अबोली - मी बदनाम बोलवाने
लाजून बोल ना तू- जे म्हटले मुक्या क्षणाने

ओठात माझिया हे - शब्दा विनाच गाणे
ते ओठ ओठ नहीं ते - झाले तुझेच देणे

अंतर्यात गीताच्या - सगळी अंतरे बुडाली
बघ ध्रुव पदावरी आहे - फिरुनी तूझेच येणे

माझी कविता ..मयुरेश साने २८ -एप्रिल -2010

जे उत्तर माला हवे ते..ओठातच... दडले होते

ते मुजोर आसमान ही.... तेव्हा रडले होते
माझ्या नयनिचे श्रावण...त्याने ही पाहिले होते

भिजलो जेव्हा तिच्या आठवणीच्या पावसात
कोरडे माझे अश्रु....मी चुप-चाप ढाळले होते

काटेच जरी का उरले आता माझ्या दारी
फूल ते सुगंधी....सांग!... कुणी माळले होते ?

कुस्करून जरी ती गेली.... मनरंग फुलांचे झेले
ताटवे फुलांचे येथे ........मी दिनरात उधळले होते

लाख चुका जरी केल्या...विरहात तुला स्मरताना
ही असून दुबळी झोळी ... मी जोगवे मागितले होते

कारणेच देत रहा!.... तू... कारणांची... विनाकारण
जे उत्तर माला हवे ते..ओठातच... दडले होते

माझी कविता...मयुरेश साने. दि.२९-जुलाई-10

हारलेले डाव मी,खेलू कितीदा?

हारलेले डाव मी,खेलू कितीदा?
हुकुम तू माझा- "मी" हुकुमी हरू कितीदा ?

तोच माझा प्रश्न - तुला विचारू कितीदा ?
अन होकारास तू- नाकारतेस कितीदा!

दे माला पायवाट तुझी -आता तरी
हरवू मी मला तुझ्या आरण्यात कितीदा ?

माझी कविता ...मयुरेश साने.

मन झाले ओले चिम्ब.......

मन झाले ओले चिम्ब, तुझ्या आठवांचा गंध I
दाही दिशा माझ्या हाका , तुझे आकाश अथांग II

बेधुंद तू लाट ,माझ्या आयुष्याची पहाट I
मी किनारा कोरडा , तू प्राजक्ताचा सडा II

मी तहान तहान , तू ओले चिम्ब रान I
मी चातकाची चोच , तू निरभ्र आकाश II

मी आता काट्यात, तू फूलता फुलात I
सांभाळ माझी फुले , जी फुलली निरंतर अश्रु धारांत II

माझी कविता ...मयुरेश साने...१७-जून-१०

पुन्हा कधी तू ये अशी............ उन्हात सावली जशी

पुन्हा कधी तू ये अशी
उन्हात सावली जशी
पुन्हा तशीच काढली
रात्र मी कशी बशी I

पुन्हा जरी जुना गुन्हा
सजा नवीन दे अशी
पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा
जशी माला हवी तशी I

पुन्हा तशीच भेटना
लाजलाजुनी अशी
जशी वसंतात ये
ऊमलुनी कळी तशी I

माझी कविता... मयुरेश साने...

काटयास वेदनेचा ,भलता सराव आहे.

नाही मुकी कळी
हा फूलता गुलाब आहे
काटयास त्या कळेना
कसला रुबाब आहे ?

बळी का उगाच जाती ?
फुलणेच जीव घेणे .
काटाच का बिचारा
बदनाम होत आहे?

इतकी फुले फुलोनी ,आहेत भोवताली
काटयास वेदनेचा ,भलता सराव आहे.

छळते माला कधीचे , ते फुल एक ताजे
फुल पाखरू बनुनी, मी रोज गात आहे .

माझी कविता... मयुरेश साने....

दुख्खास जालुनी माझ्या मी निजानंदी तेवावे .

निस्पृह ज्योत बनुनी मी
दिन रात असे पेटावे
दुख्खास जालुनी माझ्या
मी निजानंदी तेवावे .

अंधारल्या दिशांना
दीप दान मी द्यावे.
मग खुशाल रवी बिम्बाने
संध्यालुनिया जावे.

कधी निरांजन कधी नंदादीप
कधी दीपस्तंभ मी व्हावे .
काजवा होउन मी ही
कधी गर्द रानी लुक्लुकावे.

पेटता सोहळा माझा
दिन रात पेट्न्या साठी.
कधी देव घरातील पणती
कधी मशाल क्रांति साठी.

वादळ वार्यानेही ओंजळ बनून रक्षावे
ज्योति ने मग माझ्या तारा बनून जावे.

हर एक कणा तुन पेटुनी
मी मुळी ना विझुन जावे
लावून मनाला चटका
मी तुझ्यातुनी पेटावे.

माझी कविता ..मयुरेश... २७-एप्रिल-2010

चांदणे मलाच का फसवून गेले I

असा कसा कोरड़ा राहिलो मी ?
ऊनही पावसात न्हाऊन गेले I

तुझ्या घरी रोज कोजागिरी
चांदणे मलाच का फसवून गेले I

मी दिवा विझवून ही माझ्या हातांनी
संशयी वारे तिथे वाहून गेले I

का रहावे मी ईमानी?
बेईमानी आसवांनी दुख माझे वाहून नेले I

माझ्या डोळ्यात आपली लायकी पाहूनही
सारे बेरड मलाच आरसा दाखवून गेले I

तुझ्या आठवान्चाच प्रकाश आहे हा
तू लावलेले दिवे कधीच विझून गेले II

माझी कविता... मयुरेश साने...

गाजते माझी गझल

ऐकली ज्यांनी माझी गझल!
ती कुठे माझी गझल ?

तू भेटतेस ज्यांना
ते पाहती माझी गझल.

तू बोललीस की बोलते माझी गझल
तुझ्या हास्यात बहरते माझी गझल.

पहातो मी माला डोळ्यात तुझिया
तू लाजताच लाजते माझी गझल

तू नाराज न व्हावे कधीही
बघ हेलावाते माझी गझल

बिम्ब तू अन आरसा माझी गझल
तू श्रुंगारता गाजते माझी गझल

माझी गझल ..मयुरेश साने.

पुन्हा पुन्हा जन्मेन मी - नेण्या तुला माझ्या घरी .

तीच तू जागेपणी अन
तीच तू स्वप्नान्तरी
मी झोपलो की जागती
स्वप्ने खुळी वेड्यापरी

तीच तू श्रुन्गारिशी
माझिया गीतान्तुनी
पाहसी का आरसा?
बघ गीत माझे लोचनी

बघ तुझ्या माझ्यात आता
फ़क्त स्वप्नांचे धुके
तू दवात नाहता
माझी ओलावली बघ पापणी

स्वप्नात तू माझी खरी
मग जागेपणी का स्वप्न तू?
पुन्हा पुन्हा जन्मेन मी
नेण्या तुला माझ्या घरी .

माझी कविता ... मयुरेश साने... दी.०१-०५-२०१०

मी सहज म्हणून लिहावे- ते शब्दां पलीकडले व्हावे

शब्दांनी बकुळ फुलांच्या
मी माळून काव्य लिहावे
ते फूल मनातील कळीच्या
हरपुन भान फुलावे

शब्दांच्या निशिगंधाने
मग ऐसे गंधाळावे
की वादळ वारयानेही
झूळूक बनून फिरावे

शब्दातुन माझ्या मनीचे
पाखरू तुला बिलगावे
मी सहज म्हणून लिहावे
ते शब्दां पलीकडले व्हावे

माझी कविता ..मयुरेश साने. दि. १७-मार्च-१०

उशीराच जरा पण, "मी" तुला कलणार आहे !

उशीराच जरा पण, "मी" तुला कलणार आहे !
मैफिलीच्या शेवटी दाद मी घेणार आहे

बघ तुझे नाव मी लिहिले किनारी
तू जरी लाटे सवे ते पुसणार आहे

वेदना देशील ना मजला नव्या तू ?
काव्य माझे अश्रुनी फुलणार आहे

मी सोसतो आहे तुला- वेदने प्रमाणे
कन्हलो नाही कधीही याचेच सुख लाभणार आहे

माझी कविता ... मयुरेश साने.

कलियुगाच्या देवा ने - दृष्टांत माला दिला !

आता काय मागु देवा , तुझे ऐश्वर्य केवढे!
तुझ्या दारात भिकारी भर पेट ओरडे

पोट भर मिलुनही , पोट भरतच नाही
भरल्या पोटाचे ऐक उपाशी ओरडे

कर जोडाया मी आलो , तुझ्या दारातही "कर"
माला शापतो आहे ,भिकार आशिर्वादांचा गजर

तुझे भीक मागणारे आशीर्वाद सोसून
एक रूपया मी दिला , दान घडेल म्हणून

तुझ्या दारीचा भिकारी माला गर्जुन बोलला
पाच रुपे दया हो दादा ! , कुठे जमाना चालला ?

धन्यवाद देवा तुझे मज उमजली रीत
मनापासुन ते दान मिळे मागुन ती "भीक"

आता रोज घात वार, स्वैराचार, अनाचार
पाप क्षालनाला फ़क्त तुझ्या वराचा - विचार

आम्ही पोसतो रे गुन्हे -तुझे धरुनिया वार
सोमवार शंकर - गणपती मंगलवार

ज्ञानियाचा तुक्याचा तो तूच का रे देव
मीरा व्हावे तरी कसे?- तुझी आटली रे माव

कलियुगाच्या देवा ने - दृष्टांत माला दिला !
नको मागु काही वेडया - खिसा मोकला चांगला

नसे राउलात , देवलात - देव घेवितच- " देव"
देण्यासाठी नाही- घेण्यासाठी त्याची धाव !

माझी कविता - मयुरेश साने.

मग भेटू एकामेका -जसे आकाश जमीन


आसवानसवे झरे- तुझी साठवण
डोले ओले चिम्ब -तरी मी बोलतो हसून

आता माझ्यावर माझे- हे एकटेपण हासे
मी होतो तुझ्या सवे -तेव्हा ते एकलेच होते

काही केल्या माला तुझा- ठाव कसा गवसेना?
या एकाकी पणाचा सूड घ्यावा कसा? कलेना !

तुला शोधतात आता - चन्द्र सूर्य रात्रंदिन
तुला साद घाली वारा- माझी न्यारी प्रेम धून

ही विरह वेदना अशी- गुलाबी करीन
तू सदाफुली तुला मी -गुलाब देईन

वाट पाहून पाहून - वाटा शोधाया निघाल्या
होईना पहाट- तिन्ही सांजा- होत आल्या!

क्षितिजाच्या कवेतुन - तू येशील निघोन
मग भेटू एकामेका -जसे आकाश जमीन

माझी कविता ...मयुरेश साने.

नजर

ती नजर किती अलबेली, मतवाली ,मोहक न्यारी
ती नजर अशी की तिजला ,पाहती हजारो नजारा

नजरेचा नजर बंदी , मी कधीच होऊं गेलो
हर एक नजर अशी की, कुर्बान हजारो नजरा

वाटते तुझ्या नजरेची, पापणीच होउन जावे
बघताच हजारो नजारा, मी मिटुन तुज कवलावे

तो अश्रु मजा साठीचा, दाटताच नयनी तुझिया
तो ओघलन्या आधीच, मी मिटुन चिम्ब भिजावे

नजरेचा हा नजराना ,कधी नजर न लगो त्याला
ते दृष्ट काढती वेडे, मी नजरेत सामावले तुजला

माझी कविता ... मयुरेश साने.

दे ईमानी आसवे !

जीव लावून पनाला
शेते जिवानिशी गेली
कशी एकादशीला
घरी शिवरात्र आली

तुझ्या मायेची पाखर
ओली चिम्ब श्रवण सर
कुठे आटली रे देवा ?
झाले निष्ठुर अम्बर

जीव द्यावा तरी कसा ?
बघ कोरड्या विहिरी
पाण्यानेही काठो काठ
त्यात आत्महत्या केली

ऐन श्रावणात का रे?
तुझे कोरडे आभाळ
फुटे चुडा हिरवा
दिसे बोडखे कपाळ

माझ्या भरल्या डोळ्यांच्या
श्रवण सरींनी
मी पीकविन शेते
करीन हिरवी धारिणी

माझे मातीशी ईमान
पण पिक यावे कसे ?
आसवांचे सिंचन असे ठार खारे कसे ?

एक आभाळ माझ्या ही दाटले रे मनी
दे ईमानी आसवांचे श्रावण नयनी

माझी कविता... मयुरेश साने.