Sunday, September 30, 2012

जगायचे ही जबाबदारी

कशी सरावी हयात सारी
जगायचे ही जबाबदारी

जगात येणे निघून जाणे
जसे कुणी हारतो जुगारी

पुन्हा तुझे स्वप्न सोबतीला
पुन्हा नव्याने सुरू उधारी

तुझाच मी अंश अंश देवा

पुढ्यात का मी तुझ्या भिकारी

पिऊन ही वाढतेच आहे
जगायची ही तहान न्यारी

सरळपणाला मिळेल शिक्षा
तुझे गुन्हे ही तुझी हुशारी

मयुरेश साने

No comments:

Post a Comment