Sunday, February 27, 2011

तुझा दोष नाही

तुझा दोष नाही गुन्हा मीच केला
पुन्हा प्राण माझा दग्यानेच गेला

नको चांदण्याचे उशाला उखाणे
सदा जागुनी सूर्य डोळ्यात गेला

तुझ्या सौख्य हास्यात आनंद आहे
मला कोणता काळ जगवून गेला

मला सोबतीला सुन्या पायवाटा
वरातीत मेण्या तुनी जीव गेला

दिले गीत माझे तुझ्या मैफलीला
तुझा हुंदका दाद घेऊन गेला

मयुरेश साने .. दि...०२-फेब्रुवारी-११

1 comment:

  1. तुझा दोष नाही गुन्हा मीच केला
    पुन्हा प्राण माझा दग्यानेच गेला .. pahilach sher bhidla ekdam !

    ReplyDelete